आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यांनंतर सोने आले 30 हजारांखाली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दोन महिन्यांच्या मोठ्या तेजीनंतर मंगळवारी सोने प्रथमच 30 हजारांखाली आले. स्थानिक सराफा बाजारात सोने 29900 रुपये तोळा झाले. दसरा, दिवाळीत तेजीत लखलखणार्‍या सोन्याला ऐन लग्नसराईत घसरणीचा मुलामा लागला आहे. सोने आयात कमी करण्यासाठी सरकारने लादलेल्या निर्बंधांमुळेही सोने तेजीच्या रथात आरूढ झाले होते. मात्र, आता मागणी कमी झाल्याने सोन्याच्या किमती घसरल्याचे सराफा व्यापार्‍यांनी सांगितले.
मागील सात दिवसांत स्थानिक सराफा बाजारात सोन्याच्या किमती 30 हजार ते 30, 500 या पातळीत राहिल्या. दोन ऑक्टोबर रोजी सोने 30,500 रुपये होते.
दसर्‍याला सोने 30,450 रुपये तोळा होते, तर दिवाळीत सोन्याची झळाळी 30, 850 पर्यंत वाढली होती. मात्र सोमवारपासून सोने 30 हजारांखाली आले. सोमवारी सोने 29,975 रुपये तोळा तर मंगळवारी 29,900 रुपये तोळा झाले.

पुढील स्लाइडमध्ये, लवकरच सोने येणार 26,000 रुपयांवर