आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवडाभरात तोळ्यामागे सोन्याची 908 रुपये घसरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घसरणीमुळे स्थानिक बाजारपेठेमध्ये गेल्या आठवड्यात सोन्या चांदीमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण पाहायला मिळाली. एमसीएक्स (मल्टी कमोडिटी एक्स्चेंज)मध्ये डिसेंबरच्या वायदे बाजारात सोने 908 रुपयांच्या घसरणीसह 29,826 रुपयांवर बंद झाले. तर चांदी 1034 रुपयांनी घसरून 48,657 रुपयांवर बंद झाली.
स्थानिक बाजारपेठेत शनिवारी सोने गेल्या आठवड्याच्या तुलनेत 950 रुपयांनी घसरून 30,950 आणि चांदी 800 रुपयांनी घसरून 48,800 रुपयांवर पोहोचली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 36.70 डॉलर औंसच्या घसरणीसह 1315.20 डॉलर औंस आणि चांदी 0.73 डॉलर औंसच्या घसरणीसह 21.81 डॉलर औंसवर बंद झाले.
गुंतवणूकदारांचा कल इक्विटी मार्केटकडे असल्याने गेल्या आठवड्यात भारतात सोने आणि चांदीमध्ये अस्थिरता पाहायला मिळाली. अमेरिकन डॉलर युरोच्या तुलनेत 2.36 टक्के वधारला. हेही सोने चांदीच्या घसरणीमागचे एक कारण आहे. सोमवारी मात्र पेंडिंग होम सेल्सला डाटा सोन्या-चांदीसाठी सकारात्मक ठरल्याने यात तेजी अनुभवायला मिळाली. सोन्याने 31,164 तर चांदीने 49,980 पर्यंतची पातळी गाठली, पण प्रॉफिट बुकिंगमुळे पुन्हा घसरण पाहायला मिळाली. एमएफओएमसी ने मासिक 85 दशलक्ष डॉलर बाँड बाइंग कमी करण्याचा निर्णयही स्थगित केला आहे. त्याचा सोन्या-चांदीच्या किमतीवर काही काळ सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतो.
तांत्रिक विवेचनानुसार एमसीएक्सवर सोन्याने 30,450 ची पातळी पार केली तर लवकरच 30,900 आणि 31,300 रुपयांचा स्तर पाहायला मिळू शकतो. 31,700 हा सोन्यासाठी महत्त्वाचा रेझिस्टन्स आहे. त्यावर 32,500 ची वरची आणि 29,400 खालची पातळी पाहायला मिळू शकते. चांदीने 50,400 ची वरची पातळी ओलांडली, तर 51,300 आणि 52,200 रुपयांपर्यंत जाऊ शकते, पण तीने 48,000 ची खालची पातळी ओलांडली तर 47,600 आणि 46, 750 पर्यंतही घसरू शकते. गुरुवारी अमेरिकेतील बेरोजगारीची आकडेवारी, शुक्रवारी अनएम्प्लॉयमेंट रेट आणि नॉन फार्म एम्प्लॉयमेंट चेंजच्या आकडेवारीवरही गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवायला हवे.