आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोने घसरले, चांदी चकाकली; जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक संकेताचा फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि स्टॉकिस्टांकडून घटलेली मागणी याचा फटका शुक्रवारी सोन्याच्या किमतीला बसला. राजधानीतील सराफ्यात सोने तोळ्यामागे 10 रुपयांनी घसरून 28,650 झाले. चांदीने सलग दुसर्‍या सत्रात तेजी दर्शवली. चांदी किलोमागे 300 रुपयांनी वाढून 45,300 झाली.

सराफा व्यापार्‍यांनी सांगितले, सोन्याच्या सध्याच्या पातळीवर घटलेली मागणी त्यातच जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक संकेताचा फटका सोन्याला बसला. त्यातच ज्वेलर्स व किरकोळ व्यापार्‍यांनी पाठ फिरवल्याने सोन्यावर दबाब दिसून आला. सिंगापूर सराफा बाजारात सोने औंसमागे (28.34 ग्रॅम) 18 सेंटने घसरून 1316.40 डॉलर झाले. गुरुवारी सोने 1316.58 डॉलर होते. देशातील सराफ्यात सोने दोन दिवसांपासून घसरणीचा कल दाखवत आहे. गुरुवारी सोने तोळ्यामागे 50 रुपयांनी स्वस्त झाले होते. औद्योगिक क्षेत्रांतून चांगली मागणी आल्याने चांदी मात्र तेजीने चकाकते आहे. चांदी गुरुवारी किलोमागे 100 रुपयांनी वधारली होती शुक्रवारी चांदी 300 रुपयांनी महागली आहे. दोन सत्रांत चांदीने किलोमागे 400 रुपयांची वाढ नोंदवली आहे.