आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधारभूत शुल्कात वाढ, सोने महागणार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो, मुंबई - अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी एकीकडे सोन्यावरील आयात शुल्कात आणखी वाढ होण्याची शक्यता नसल्याचे संकेत दिलेले असतानाच दुसर्‍या बाजूला सरकारने सीमाशुल्क ज्यावरून निश्चित केले जाते, त्या सोन्याच्या ‘टेरिफ व्हॅल्यू’ अर्थात आधारभूत शुल्कात मात्र वाढ केली आहे. सध्या प्रती 10 ग्रॅम 516 डॉलर असलेले व्यापार शुल्क आता वाढवून प्रति ग्रॅम 521 रुपयांवर नेले असल्याचे केंद्रीय अबकारी आणि सीमाशुल्क विभागाने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशात म्हटले आहे. चांदीवरील आधारभूत किंमत मात्र सध्याच्या 930 डॉलरवरून (प्रति किलो) 920 डॉलरवर आणली आहे. सध्या सिंगापूरमध्ये सोन्याचा भाव प्रति औंस 1797.90 डॉलर, तर चांदीचा भाव प्रति औंस 27.92 डॉलर आहे. दिल्ली सराफ बाजारपेठेत सोन्याचा भाव 30,100 रुपये तोळा, तर चांदी प्रति किलो 53,200 रुपये आहे.

सोने आयातीला आळा घालणार : चिदंबरम
तस्करीला आळा घालण्यासाठी सोन्यावरील आयात शुल्कात आणखी वाढ होण्याची शक्यता नसल्याचे संकेत देतानाच वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी चालू खात्यातील फुगलेली तूट कमी करण्यासाठी महागाई निर्देशांकावर आधारित साधने बाजारात आणण्याचा मनोदय व्यक्त केला. चढ्या महागाईच्या काळात गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. सोन्याच्या वाढत्या वापरामुळे चालू खात्यातील तूट डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीमध्ये जीडीपीच्या तुलनेत लक्षणीय 6.7 टक्क्यांवर गेली. सोने खरेदीला आणि त्या अनुषंगाने होणार्‍या तस्करीला लगाम घालण्यासाठी सरकारने जानेवारी महिन्यात सोन्यावरील आयात शुल्कात वाढ करून ते 6 टक्क्यांवर नेले.

प्रयत्न सुरूच
आयात शुल्कात वाढ करून ते 4 टक्क्यांवरून 6 टक्क्यांवर नेण्यात आले असले, तरी सोन्यावरील आयात शुल्क वाढीवर काही मर्यादा आहेत. जर तुम्ही अशीच शुल्कवाढ करत राहिलात तर सोन्याच्या तस्करीत वाढ होईल, याकडे चिदंबरम यांनी लक्ष वेधले.

सोन्याच्या टेरिफ व्हॅल्यूमध्ये अबकारी मंडळाने वाढ केली आहे. या वाढीच्या परिणामी सोने महागण्याची शक्यता आहे.
दत्ता सावंत, उपाध्यक्ष, राज्य सराफ फेडरेशन