आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सणासुदीत सोने स्वस्त होण्याची आशा मावळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सोन्यावरील विद्यमान दहा टक्के सीमाशुल्क कमी करण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही, अशी माहिती वित्त राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. यामुळे ऐन सणासुदीत सोने स्वस्त होण्याच्या आशेवर पाणी पडणार आहे.

सोने आयातीमध्ये घट होऊन ती 2012-13 वर्षातल्या 845 टनांवरून मागील वर्षात 638 टनांवर आल्यामुळे मौल्यवान धातूवरील सीमाशुल्क कमी करण्यात यावे, अशी मागणी सराफा व्यावसायिकांकडून होत आहे. मागील वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या आयातीत अचानक वाढ झाल्यानंतर या मौल्यवान धातूवरील सीमाशुल्क वाढवून ते टप्प्याटप्प्याने दहा टक्क्यांवर नेण्यात आले. आयातीला निर्बंध घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेनेही काही ठोस पावले उचलली होती.
सोने आयातीत 25 टक्क्यांची घट : सोन्याची आयात 2013-14 या वर्षात 638 टनांची झाली असून त्याअगोदरच्या वर्षाच्या तुलनेत ती 25 टक्क्यांनी कमी झाली असल्याची माहिती लोकसभेत देण्यात आली.

2011-12 आणि 2012-13 या वर्षात अनुक्रमे 845 टन आणि 919 टन सोन्याची आयात झाली असल्याची माहिती वित्त राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका लेखी उत्तरात दिली. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या कालावधीत 221 टन सोने आयात झाली असून मूल्य स्वरूपात ती 54,792 कोटी रुपयांची असल्याची माहिती त्यांनी दिली. 2011-12 मध्ये 2.28 लाख कोटी रुपये, 012-13 वर्षात 2.45 लाख कोटी रुपये आणि 2013-14 वर्षात 1.60 लाख कोटी रुपयांची सोने आयात झाली.

सोने तस्करीचे प्रमाण वाढले
सोने तस्करीचे प्रमाणही वाढले आहे. 2012-13 (869) आणि 2011-12 (500) या वर्षाच्या तुलनेत गेल्या वर्षात 2,441 तस्करी प्रकरणे झाली आहेत. केंद्रीय अबकारी आणि सीमाशुल्क विभाग आणि अन्य संस्थांची सोन्याच्या तस्करीवर बारीक नजर असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.