आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने दिल्लीत 26,400; औरंगाबादेत 26,700

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीत मंगळवारी सोन्याचे भाव 1,160 रुपयांनी घसरून 26,440 रुपये तोळा झाले. औरंगाबाद शहरात मात्र सोने 300 रुपयांनी वधारून 26,700 रुपयांवर पोहोचले. दिल्लीत 27 नोव्हेंबरच्या तुलनेत सोन्यात 25 टक्के म्हणजे जवळपास 6,325 रुपयांपर्यंत स्वस्ताई आली आहे.

सोन्या-चांदीत आणखी घसरणीची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली असून, भाव 24000 ते 26 हजारांवर येण्याचा कयास आहे. सोने 24,500 तोळा व चांदी 39 हजार रुपये किलोवर येण्याचा अंदाज बॉम्बे बुलियन असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुरेश हांडिया यांनी व्यक्त केला. मुंबईत सोने 650 रुपयांनी घसरून 26,040 वर आले. चांदी 630 रुपये घसरणीसह 26 महिन्यांची नीचांकी 46,360 रुपयांवर आली. बँक ऑफ अमेरिका आणि मेरिल लिंच नुसार आगामी काळात सोने प्रति औंस 1200 रुपयांपर्यंत घसरू शकते.

घसरण अशी
शहर घट भाव
दिल्ली 1,160 26,440
मुंबई 650 26,040
चेन्नई 725 26,105
कोलकाता 665 26,945

22 ते 24 हजारांचा अंदाज
विश्लेषकांच्या मते देशात सोन्याचे भाव 22 ते 24 हजारांपर्यंत घसरू शकतात.