आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने होणार आणखी स्वस्त, पुढल्या वर्षी 20 हजारांवर पोहचण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आगामी काळात सोने आणखी स्वस्त होणार आहे. डॉलरच्या मुल्यात येणारे स्थैर्य हे त्याचे प्रमुख कारण. आंतररा्ष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये झालेली सुधारणा यामुळे डॉलरचे मूल्य इतर चलनांच्या तुलनेत दिवसेंदिवस मजबूत होत आहे. जागतिक बाजारात सोने सध्या सा़डे चार वर्षातील नीचांकी पातळीवर 1137.40 डॉलर प्रति औंस आहे.

आर्थिक व्यवहारात असणारी कंपनी एबीएन अॅमरोनुसार या वर्षाच्या अखेरीपर्यंत हा दर 1100 डॉलरच्या खाली जाण्याची शक्यता आहे. 2015 च्या अकेरीपर्यंततर ही पातळी 800 डॉलर प्रति औंसवर पोहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे परदेशी बाजारांमध्ये दर 1100 डॉलरच्या खाली आला तर याठिकाणी याची किंमत 24 ते 25 हजार रुपये तोळा राहील. पण आंतरराष्ट्रीय दर 800 डॉलरवलर आल्यास प्रतितोळा सोने 20 हजारावर पोहोचण्याची शक्यता आहे. बुधवारी सोने 39 महीन्यांनी 26,000 च्या खाली आले होते.

लग्नसराई तोंडावर असूनही सोने-चांदीच्या किमती फारशा वाढण्याचे संकेत नाहीत. दिवाळीच्या दिवशी सोन्याचे दर 27,850 रुपये तोळा होते. पंधरा दिवसांत ते 25,900 वर आले. चांदीही 38,900 वरून 35,050 वर आली आहे. म्हणजे सोने 15 दिवसांत 7 टक्क्याने तरस चांदी 9.8 टक्क्याने घसरले आहे.
भारताची स्थिती
- सोन्याच्या विक्रीचा विचार करता भारत दुस-या स्थानी आहे. दर कमी होऊनही मागणी कमी आहे. सर्वाधिक विक्री होणा-या चीनमध्येही अशीच स्थिती आहे.
- चालू खात्याचा तोटा कमी करण्यासाठी भारताने सोन्याच्या आयातीवर अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे आयातही घटली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारताकडून होणारी मागणीही घटली आहे.
- भारतात दरवर्षी सरासरी 900 टन सोन्याची विक्री होते. 2020 पर्यंत हे प्रमाण 1200 टन पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.