मुंबई - बॅँकांच्या सुवर्ण ठेवींना बंधनकारक रोख राखीव प्रमाण किंवा वैधानिक रोकड सुलभता प्रमाण दर्जा द्यावा, अशी मागणी सार्वजनिक क्षेत्रातील दोन बॅँकांनी केली आहे. सोन्याचेदेखील ठरावीक मूल्य आहे. त्यामुळे नियंत्रक बॅँकांच्या सोन्यातील ठेवींना रोख राखीव प्रमाण किंवा वैधानिक रोखता प्रमाण म्हणून गृहीत धरू शकतील का, असा प्रश्न स्टेट बॅँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी उपस्थित केला. हिरे आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या बॅँक परिषदेत त्या बोलत होत्या.
सोन्याच्या आयातीमुळे चालू खात्यातील तुटीवर ताण आल्याचे लक्षात घेता देशात उपलब्ध असलेल्या सोन्याचा उपयोग करण्याची नितांत गरज असल्याचे भट्टाचार्य म्हणाले.