आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने चांदी स्वस्त, रुपया आपटला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक संकेत आणि ज्वेलर्स, रिटेलर्सकडून घटलेली मागणी यामुळे सोने तोळ्यामागे ४१० रुपयांनी घसरून २७,७९० वर आले. हा सोन्याचा दोन आठवड्यांचा नीचांक आहे. औद्योगिक क्षेत्रातून मागणी घटल्याचा फटका चांदीला बसला. चांदी किलोमागे ८२० रुपयांनी घटून ३७,५३० झाली. सराफा व्यापा-यांनी सांगितले, देशातील सराफ्यात घटलेली मागणी, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढीचे दिलेले संकेत व जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक संकेत यामुळे सोने तोळ्यामागे ४१० रुपयांनी घसरले.

रुपया आपटला : दोन दिवस डॉलरची धुलाई करणारा रुपया आपटला. डॉलरच्या तुलनेत ४८ पैशांनी अवमूल्यन होऊन रुपया ६२.१७ या चार आठवड्यांच्या नीचांकावर आला.