आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत सोने, चांदी घसरले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक सूर आणि स्टॉकिस्ट्सकडून झालेली विक्री याचा फटका बुधवारी मौल्यवान धातूंच्या किमतींना बसला. राजधानीतील सराफ्यात सोने तोळ्यामागे 365 रुपयांनी घसरून 30,035 झाले. चांदी किलोमागे 420 रुपयांनी स्वस्त होऊन 44,700 झाली. सराफा व्यापा-यांनी सांगितले, अमेरिका फेडरल रिझर्व्ह आर्थिक मदतीचा हात आखडता घेणार असल्याच्या वृत्ताने जागतिक सराफा बाजारात सट्टेबाजी दिसून आली. त्याचा परिणाम देशातील सराफा बाजारात दिसून आला व सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या. सिंगापूर सराफा बाजारात सोने औंसमागे (28.34 ग्रॅम) 0.5 टक्क्यांनी घसरून 1239 डॉलरवर आले. चांदी औंसमागे 0.3 टक्क्यांनी घटून 20.19 डॉलर झाली.
रुपया दोन पैशांनी घसरला
मुंबई । आयातदारांकडून डॉलरला आलेल्या ताज्या मागणीचा फटका बुधवारी रुपयाला बसला. त्यामुळे गेल्या तीन सत्रांत प्रथमच रुपयाचे अवमूल्यन झाले. डॉलरच्या तुलनेत रुपयाने दोन पैसे गमावत 61.54 ही पातळी गाठली. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारातील तेजीमुळे रुपयाला बळ मिळाले.