आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gold, Silver Decline On Stockist Selling, Weak Global Cues News In Divya Marathi

दिल्लीत सोने, चांदी घसरले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणा, युक्रेनचा तणाव आणि जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक संकेत यांचा फटका मंगळवारी मौल्यवान धातूंच्या किमतींना बसला. राजधानीतील सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 200 रुपयांनी घसरून 30,000 झाले. चांदी किलोमागे 600 रुपयांनी घटून 43,300 झाली. सराफा व्यापार्‍यांनी सांगितले, गेल्या काही दिवसांतील तेजीने सोने तीन आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले होते. नफेखोरीचा फटका सोन्याच्या किमतींना बसला. सिंगापूर सराफा बाजारात सोने औंसमागे 1.2 टक्क्यांनी घसरून 1312.41 डॉलर झाले.