आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gold, Silver Drop On Renewed Selling Amid Global Rout

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोने, चांदी, रुपयात घसरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई, नवी दिल्ली - मौल्यवान पिवळ्या धातूंतील दोन दिवसांच्या तेजीला बुधवारी ब्रेक लागला. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे १८० रुपयांनी घसरून २८,०९० झाले. चांदी किलोमागे ५० रुपयांनी घटून ३८,४०० झाली. दरम्यान, विदेशी मुद्रा विनिमय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया ८ पैशांनी घसरून ६१.७५ झाला. काही बँकांकडून डॉलरला चांगली मागणी आल्याचा फटका रुपयाच्या मूल्याला बसला.

सराफा व्यापार्‍यांनी सांगितले, ज्वेलर्स व रिटेलर्सकडून सोन्याला मागणी न आल्याने सोने घसरले. जागतिक सराफ्याती नकारात्मक कलामुळेही सोन्यावरील दबाव वाढला. न्यूयॉर्क बाजारात सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम ) १.०८ टक्क्यांनी घसरून १२६०.१० डॉलर झाले.

ग्रीस संकटावर तोडगा निघण्याच्या आशेने जगातील प्रमुख शेअर बाजारात आलेल्या तेजीने मौल्यवान धातूच्या किमतीवर दबाव आला. देशातील औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला मागणी नसल्याने चांदी घसरली.