आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gold, Silver Extend Losses On Sustained Selling, Global Cues

जुलैमध्ये सोने, चांदी आयात घटण्याची आशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पिवळ्या मौल्यवान धातूच्या खरेदीचा मोह टाळण्यासाठी कें द्र सरकार आणि रिझर्व्ह बॅँकने केलेल्या विविध उपाययोजनांची चांगली फळे मिळण्यास सुरुवात झाली आहे. जून महिन्यात सोने आणि चांदीची आयात दोन ते अडीच अब्ज डॉलरपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे. मे महिन्यात हीच आयात 89 टक्क्यांनी वाढून 8.39 अब्ज डॉलरवर गेली होती. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात तर हीच आयात 109 टक्क्यांन वाढून 15.88 अब्ज डॉलरवर गेली होती.

सरकार आणि आरबीआयने केलेल्या कडक उपाययोजनांमुळे या दोन्ही मौल्यवान धातूंची आयात जूनमध्ये 2 ते 2.5 अब्ज डॉलरपर्यंत खाली येण्याची अपेक्षा वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकार्‍याने व्यक्त केली. वित्तमंत्र्यांनी देखील सोने खरेदीचा मोह टाळून अन्य वित्तीय साधनांमध्ये गुंतवणूक करा असे आवाहन जनतेला केले होते. सोने आणि चांदी आयातीची अंतिम आकडेवारी या महिन्याच्या मध्यास वाणिज्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात येणार आहे.