आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत सोने-चांदी चकाकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजधानीतील सराफ्यात मंगळवारी सलग तिसर्‍या दिवशी मौल्यवान धातूंचा रथ तेजीने लखलखला. सोने तोळ्यामागे 300 रुपयांनी चकाकून 30,700 झाले. चांदी किलोमागे 590 रुपयांनी वाढून 44,200 झाली.
सराफा व्यापार्‍यांनी सांगितले, लग्नसराईमुळे सोने आणि चांदीला ज्वेलर्स आणि स्टॉकिस्टांकडून चांगली मागणी आली.
त्याचा फायदा सोने, चांदीला झाला. त्यातच जागतिक सराफा बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे मौल्यवान धातूंची चकाकी वाढली. सिंगापूर सराफा बाजारात सोने औंसमागे (28.34 ग्रॅम) 0.3 टक्क्यांनी वाढून 1261.15 डॉलर झाले.
चीनमधील आर्थिक वाढीचे कमकुवत कल तसेच अमेरिका व ब्रिटनमधील आर्थिक पेच यामुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सोन्याकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.