आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने चकाकले, चांदी चमकली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिवाळी जसजशी जवळ येत आहे, तशा सोन्याच्या किमती वाढत आहेत. नवी दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी सोने 305 रुपयांनी वाढून 31,930 वर पोहोचले. चांदीनेही किलोमागे 1190 रुपयांची वाढ नोंदवत 50,200 ची पातळी गाठली. सराफा व्यापार्‍यांनी सांगितले, सणांचा हंगाम तसेच लग्नसराईमुळे सोन्याला मागणी वाढली आहे, तर नाणी निर्माते आणि औद्योगिक क्षेत्राकडून मागणी आल्याने चांदी चकाकली. जागतिक सराफा बाजारातही सोने चकाकले. न्यूयॉर्क सराफा बाजारात सोने औंसमागे 2 टक्क्यांनी वाढून 1342.60 डॉलर झाले. सोन्याचा हा एक महिन्याचा उच्चांक आहे. चांदीही औंसमागे 2.3 टक्क्यांनी वाढून 22.79 डॉलर झाली.