आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोने घेणे होणार आणखी अवघड, घर घेणा-यांना मात्र आरबीआयचा दिलासा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सोन्याने प्रतितोळा तीस हजाराची पातळी केव्हाच ओलांडली असल्याने इच्छा असूनही अनेक ग्राहकांना सोने खरेदी करता येत नाहीये. मात्र दुसरीकडे आरबीआयने व्याजदरात घट करण्याचे जाहीर केल्याने घर खरेदी करणा-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
फ्लोटिंग इंटरेस्ट रेटनुसार होम लोन घेतलेल्या ग्राहकांना आरबीआयने मंगळवारी आनंदाची बातमी दिली. आरबीआयने म्हटले आहे की, जे ग्राहक वेळेच्या आधी फ्लोटिंग रेटमधील होमलोन परत करतील त्यांच्याकडून प्री-पेमेंट पेनाल्टी (दंड) घेता येणार नाही. तसेच हा नियम घोषणा केल्यापासून लागू होईल, असे आरबीआयने म्हटले आहे.
याआधी आरबीआयने २०१२-१३ या आर्थिक वर्षात बॅंकांच्या वार्षिक आर्थिक पतधोरण बैठकीत सांगितले होते की, फ्लोटिंग रेटनुसार होम लोन घेणा-या व वेळेच्या आधी कर्ज फेडू इच्छिणा-या ग्राहकांकडून कोणतीही पेनाल्टी (दंड) घेऊ नये. त्यानंतर काही मोठ्या बॅंकांनी प्री-पेमेंट पेन्लाटी हटविली होती. मात्र काही बॅंका ग्राहकांकडून १ ते २ टक्के दंज वसूल करीत होत्या. त्यामुळे अखेर आरबीआयने सर्वच बॅंकांना दंड न घेण्याचा आदेश काढला आहे.
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात नफेखोरीसाठी देशातंर्गत बाजारपेठेत सोने आणि चांदी यांच्या किमती चढ्याच आहेत. सध्या सोन्याचा दर प्रतितोळा ३० हजार २०० रुपये आहे. तर चांदी ५४ हजार ३००च्या घरात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस १६१७ डॉलर इतका आहे. रुपयाचे अवमूल्यन कायम असून १ डॉलरसाठी भारताला अजूनही ५५ रुपयापेक्षा जास्त रक्कम मोजावी लागत आहे.
व्याजदर कपातीच्या आशेचा शेअर बाजारावर शिडकावा
आरबीआयचे संकेतः संधी व्याजदर कपातीची..
व्याजदर कपातीचे सर्व स्तरांतून स्वागत;रिझर्व्ह बँकेचे सकारात्मक पाऊल