आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Valentine Spls: अबब! 24 कॅरेट सोन्याने बनलेला 22 कोटींचा Iphone 6 आणि 6+

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'व्हेलेंटाईन डे' आता अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळेच प्रत्येक कंपन्या तरूण तरूणींना आकर्षित करण्यासाठी काही ना काही शक्कल लढवत आहे. यामध्ये सोन्याचे गॅझेट बनवणारी जगप्रसिध्द कंपनी असलेल्या Goldgenie नेही उडी घेतली आहे. गोल्डजीनने खास व्हेलेंटाईन डे साठी Iphone 6 आणि 6+ या फोनचे चे गोल्ड व्हर्जन (Goldgenie) लॉन्च केले आहे. विशेष म्हणजे हा मोबाईल पुर्णपणे 24 कॅरेट सोन्यापासून बनलेला तर आहेतच त्यासोबतच या फोनचे प्लॅटीनम आणि पिंक (रोज) गोल्ड असे दोन पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आता पुर्ण फोन सोन्याचा म्हटला तर तुम्ही याच्या किंमतीच्या बाबतीत अंदाज लावत असाल. तर अॅपलच्या या Goldgenie मोबाईलची किंमत आहे फक्त 22 कोटी.

किंमत आणि फिचर्स
या लिमिटेड इडिशन Iphone 6 आणि 6+ ची कमीत कमी किंमत ही 15000 डॉलर्स ते 35 लाख डॉलर्स पर्यंत आहे. यामध्ये IPhone चे 6 आणि 6+ हे दोनच मॉडेल 24 कॅरेट गोल्ड, गुलाबी (रोज) गोल्ड आणि प्लॅटिनममध्ये उपलब्ध आहेत. मेमरीच्या बद्दल बोलायचे झाल्यास हे फोन 16GB, 64GB आणि 128GB अशा व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. केवळ सोनेच नाही तर या फोनवर हिरेही लावण्यात आले आहे. हिरे जडीत आयफोनची किंमत नक्कीच जास्त आहे.

कुठे उपलब्ध होईल?
हा फोन जर विकत घेण्याची इच्छा असेल तर तुम्हाल Goldgenie च्या अधिकृत वेबसाईट http://www.goldgenie.com/in/ वरून हा विकत घेता येईल. हा फोन ऑर्डर करताच तुम्हाला घरपोच हा फोन मिळेल. शिवाय फ्री शिपिंग असल्याने तुम्हाला इतर कुठलीही रक्कम द्यावी लागणार नाही. या फोनमधील सर्वात विशेष म्हणजे हा फोन फुल्ली कस्टमाईज आहे. म्हणजेच तुम्हाला हवा तसा हा फोन डिझाईन करून देण्यात येईल. एवढेच नाही तर यावरील हिऱ्यांची संख्याही तुम्ही कमी जास्त करू शकता. हिऱ्यांच्या संख्येनुसार या फोनची किंमत बदलणार एवढं मात्र नक्की.
फोटो आणि व्हिडीओ सौजन्य http://www.goldgenie.com/
पुढील स्लाईडवर पाहा, या मोबाईलचे आकर्षक डोळे दिपवून टाकणारे फोटो आणि शेवटच्या स्लाईडवर VIDEO सुध्दा...