आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निफ्टी गाठणार सात हजार 600 चा पल्ला, गोल्डमन सॅक्सचा अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जागतिक स्तरावरील बाह्य घडामोडींमुळे निर्माण होणारी जोखीम कमी होत असल्याने गोल्डमन सॅक्स या अमेरिकेतील आघाडीच्या ब्रोकर कंपनीने भारताच्या पतमानांकाचे जरा जास्त वजन वाढवले आहे. इतकेच नाही तर राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी यंदाच्या वर्षात 7,600 अंकांच्या शिखरापर्यंत झेप घेईल, असाही अंदाज व्यक्त केला आहे. गोल्डमन सॅक्सच्या सकारात्मक भूमिकेमुळे निफ्टीने मंगळवारीच नवी विक्रमी पातळी गाठली होती.


देशातील परिस्थिती सुधारत असल्याने बाह्य जोखमींचे प्रमाण कमी होत आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे चालू खात्यातील तुटीवरचा ताण हलका झाला असून विदेशी चलन गंगाजळीत वाढ झाली आहे, तसेच रुपयाचे मूल्यही स्थिरावले असल्याचे गोल्डमन सॅक्सने म्हटले आहे.


निवडणुकांकडे लक्ष
लोकसभा निवडणुका स्थानिक पातळीवरील महत्त्वाचा घटक असल्याने निवडणुकांमध्ये कोणत्या समभागांची कमाई होते याकडे लक्ष ठेवा, असा सल्ला देतानाच एप्रिलमध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकांचा सुधारणांच्या प्रगतीवर महत्त्वाचा परिणाम होणार आहे. निवडणुकांच्या कालावधीतील समभागांचे मूल्यांकन आणि निधीचा ओघ याच्या अगोदरच्या निवडणुकांतील विश्लेषणावर नजर टाकली असता निवडणूकपूर्व तेजीला अद्यापही वाव असल्याचे गोल्डमन सॅक्सने म्हटले आहे.


लाभ होणारे समभाग
ओएनजीसी, कोल इंडिया, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी