फेसबुक वापरणा-यांसाठी चांगली / फेसबुक वापरणा-यांसाठी चांगली बातमी

दिव्‍य मराठी

Apr 06,2012 11:02:53 PM IST

तुम्ही फेसबुकवर असाल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. तुम्हाला आणखी एक सुविधा मिळणार आहे. कारण आता फेसबुकवर तुमची भाषा समजणार आहे. फेसबुकने यासाठी प्रयत्न करून हिंदी, मराठीसह सात भारतीय भाषांचा वापर करू देण्याचे जाहीर केले आहे. आतापर्यंत फेसबुक फक्त इंग्रजीच भाषा जाणत होता. पुढच्या महिन्यापासून टप्प्याटप्प्याने विविध भारतीय भाषांच्या सेवा उपलब्ध करून देणार आहे. देशात फेसबुकचे 5 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. अमेरिकेनंतर भारतच दुसरे मोठे मार्केट आहे.

X
COMMENT