आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Good News! Now Get Yours Cheque Book, Account Information On Miss Call

खुश खबर! मिस कॉलवर मिळणार चेकबुक, खात्याची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - आता केवळ मिस कॉल देऊन नवे चेकबुक आणि बँक खात्यातील जमा रकमेबाबत माहिती मिळणार आहे. खासगी क्षेत्रातील दुस-या क्रमांकाची सर्वात मोठ्या कर्जदात्या एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ही सेवा सुरू केली आहे. या सुविधेचा लाभ घेणा-या ग्राहकाला विविध सेवांसाठी बँकेच्या शाखेत तसेच एटीएमपर्यंत जाण्याची तसेच मोबाइल आणि इंटरनेट बँकिंगची गरज भासणार नाही.
एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष (डिजिटल बँकिंग) नितीन चुघ यांनी सांगितले की, या सेवेच्या माध्यमातून बेसिक फोनधारक नेट कनेक्टिव्हिटी नसतानाही बँकेच्या सेवांचा लाभ घेऊ शकतात. बँकेने अद्याप या सेवेची औपाचारिक घोषणा केलेली नाही. मात्र, या सुविधेची लोकप्रियता वाढत चालली आहे. गेल्या महिन्यात या सेवेचा लाभ घेत ग्राहकांनी सुमारे 17 लाख रुपयांचे व्यवहार केले आहेत.
*2.87 कोटी ग्राहक आहेत एचडीएफसी बँकेचे देशात.
मिस कॉल क्रमांक
1800-270-3333 : बॅलन्स इन्क्वायरी
1800-270-3344 : डाऊनलोड
मोबाइल बँकिंग अ‍ॅप
1800-270-3355 : मिनी स्टेटमेंट
1800-270-3366 : चेकबुक रिक्वेस्ट
1800-270-3377 : अकाउंट स्टेटमेंट
1800-270-3388 : ई-मेल रजिस्ट्रेशन
अशी करा नोंदणी
० मोबाइल क्रमांकाची नोंदणी करा. त्यासाठी -
० कस्टमर आयडी
० बँके खाते क्रमांकातील शेवटचे चार अंक
० नंतर रजिस्टर मोबाइलद्वारे एसएमएस करा