आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Google Domain Registration Service News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

GOOGLE ची लवकरच \'डोमेन नेम\' सर्व्हिस; \'गो डॅडी\'ला देणार टक्कर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
GOOGLE हे जगातील सगळ्यात मोठे सर्च इंजिन आहे. GOOGLE तर्फे लवकरच 'डोमेन नेम' रजिस्ट्रेशन सर्व्हिस सुरु होणार आहे. सध्या GOOGLE आता अशा सेवा शोधत आहे, ज्याच्या मदतीने 'डोमेन नेम' शोधता येईल तसेच ते खरेदीही करता येईल.

माहिती तंत्रज्ञानात झपाट्याने विकास झाला आहे. इंटरनेट युजर्सची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. प्रत्येकाला ऑनलाइन उपस्थितीचे महत्त्व कळले आहे. यातून 'डोमेन नेम'ची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे.
'गो डॅडी' शेअर्स विकून एक अब्ज डॉलरपर्यंत रक्कम जमवण्याचा प्रयत्न करत असतानाच GOOGLE ने ही घोषणा केली आहे. 'गो डॅडी' जगातील सर्वात मोठ्या 'डोमेन नेम रजिस्ट्रेशन' कंपन्यांपैकी एक आहे.

डॉट सेक्स, डॉट म्युझिकसारख्या नावांसाठी स्पर्धेत असलेली डिजिटल मार्केटिंग सर्व्हिस एजन्सी 'व्हीएमएल'चे अध्यक्ष कीथ तिमिमी यांनी सांगितले, 'या निर्णयाने GOOGLE थेट गो डॅडीचा स्पर्धक बनला आहे. '
व्यवसायात होणार वाढ?
GOOGLE चा जगातल्या सगळ्यात चर्चेत असलेल्या सर्च इंजिन्समध्ये समावेश आहे. 'गो डॅडी' ही जगात 'डोमेन नेम' रजिस्ट्रेशन करणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे. GOOGLE आपल्या बळावर कारभार वाढवण्यासाठी अन्य चार मोठ्या कंपन्यांची हातमिळवणी केली आहे.
स्क्वायरस्पेस, विक्स, व्हीबली आणि शॉपिफाय या जगातल्या वेबसाइट बनवणार्‍या चार सर्वश्रेष्ठ कंपन्या आहेत.

आता रशियन, चिनी भाषेतदेखी इंटरनेट डोमेन
GOOGLE च्या सूत्रांनी सांगितले, की ग्राहकांना डोमेन मॅनेजमेंट सपोर्टसोबतच प्रोव्हायडर्सकडून दिल्या जाणार्‍या होस्टिंग सर्व्हिस उपलब्ध देण्‍याबाबत काम सुरु आहे. GOOGLE च्या या नवीन उपक्रमामुळे याच्या अॅडवडर्ससारख्या अन्य सेवांसाठी बाजारपेठ मिळण्यास मदत होईल, असे तिमिमींनी सांगितले. 'डोमेन नेम सर्व्हिसमुळे GOOGLE च्या व्यावसायात मोठी वाढ होईल.
(स्त्रोत- BBC हिंदी)