आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Happy b\'day Google: मोफत सुविधा देऊनही कशा प्रकारे कमावते अब्जावधी रुपये ही कंपनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कॅलिफोर्निया येथील गूगल हेडक्वाटरचा फोटो)
गॅजेट डेस्क - जगातील सर्वात मोठी सर्च कंपनीचा उद्या वाढदिवस आहे. गुगलने 2005 मध्ये अधिकृतरित्या 27 सप्टेंबरला कंपनीचा वाढदिवस करण्याचे जाहिर केले होते. यापूर्वी गुगले त्यांच्या वाढदिवसाची तारीख अनेक वेळा बददली आहे. 4 सप्टेंबर 1998 ला बनलेल्या या कंपनीने सप्टेंबरच्या अनेक तारखांना आपल्या वाढदिवसासाठी निवडले होते. यामध्ये 4, 7, 15, 26 सप्टेंबर असे फिरल्यानंतर शेवटी 2005 ला गुगलने 27 सप्टेंबर ही तारीख त्यांच्या वाढदिवसासाठी निश्चित केली होती.
2005 नंतर दरवर्षी 27 सप्टेंबरला गुगल आपल्या होमपेजवरील डूडल अधिका आकर्षक बनवतो. मागील वर्षी 27 सप्टेंबरला गुगलने कँडी गेम डूडल त्यांच्या होमपेजवर लावले होते.
गुगल कंपनी त्यांच्या युजर्सला सर्व सर्व्हिसेस मोफत देते, मात्र तरीही ही कंपनी जगातील सर्वात जास्त रेव्हेन्यू कमावणारी कंपन्यांपैकी एक आहे. तुम्हाला माहिती आहे का गुगल त्याच्या युजर्सला अनेक सर्व्हिसेस मोफत देऊन सुध्दा त्याची कमाई अब्जावधीमध्ये आहे. खरं तर आपण ज्या सर्व्हिसेसला मोफत समजतो त्यावरूनच गुगल कोट्यवधी रुपये कमावते.
इतर कंपन्या युजर्सची माहिती गुगलला पैसे देऊन विकत घेतात, तसेच त्यांच्या जाहिरातींसाठी ते गुगलला पैसे देतात. जाहिरातींवर क्लिक केल्यास प्रत्येक क्लिकच्या बदल्यात गुगल त्या कंपनीकडून काही सेंट्स पासून शेकडो डॉलरपर्यंत पैसा वसूल करते.
पुढील स्लाईडवर पाहा, कशा प्रकारे गुगल पैसा कमावतो...