गुगलचा टॅब्लेट आला! / गुगलचा टॅब्लेट आला!

वृत्तसंस्था

Jun 28,2012 11:00:19 PM IST

सॅन फ्रान्सिस्को - टॅब्लेट कॉम्प्युटरच्या स्पर्धेत गुगलनेही पहिले पाऊल टाकले आहे. कंपनीने बुधवारी ‘नेक्सस-7’ हा टॅब्लेट सादर केला. हा टॅब्लेट 199 डॉलर्सला (11 हजार रुपये) उपलब्ध होईल. अ‍ॅपलच्या आयपॅड आणि अ‍ॅमेझॉनच्या किंडल फायरसोबत गुगलच्या टॅब्लेटचा मुकाबला आहे. अ‍ॅपलप्रमाणे गुगलही नेक्ससच्या माध्यमातून चित्रपट, पुस्तके आणि संगीताची ऑनलाइन सेवा पुरवणार आहे.
पुस्तकाच्या पेपरबॅक आवृत्तीइतके वजन असलेला टॅब्लेट 7 इंचाचा आहे. गुगलच्या अँड्राईड टीमचे प्रमुख ह्यूगो बारा यांनी कंपनीच्या डेव्हलपर्सच्या वार्षिक परिषदेत नेक्सस-7 सादर केला. गुगलने अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टिमच्या जेली बीन 4.1 या आवृत्तीचीही घोषणा केली. नेक्ससमध्येही हीच ऑपरेटिंग सिस्टिम वापरली जाणार आहे. हार्डवेअर कंपनी आसुसच्या सहकार्याने निर्माण करण्यात आलेला नेक्सस -7 भारतात तो केव्हा उपलब्ध होईल याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही.
वैशिष्ट्ये
1280 बाय 80 पिक्सेल रिझोल्यूशन, 7 इंच स्क्रीन, 340 ग्रॅम वजन
1.3 गीगाहर्ट्झ टेग्रा 3 प्रोसेसर, 1 गिगाबाइट क्षमतेची रॅम
4325 एमएच बॅटरी, 9 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक, 300 तासांचा स्टँडबाय
व्हाइस सर्चसारखे नवे फीचर्स
वायफाय, ब्लूटूथ, यूएसबी, मायक्रो यूएसबी, अँड्रॉइड बीम, जीपीएस

X
COMMENT