आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

15 सप्टेंबरला लॉन्च होणार गुगलचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गुगलचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन)

गॅजेट डेस्क - गूगलने इन्वीटेशन पाठवून त्यांचा बहूप्रतिक्षित Android One smartphone येत्या 15 सप्टेंबरला भारतात लॉन्च करणार असल्याचे सांगितले आहे. जूनमध्ये GoogleI/O कॉन्फ्ररन्समध्ये गुगलने त्यांचे पार्टनर कार्बन, मायक्रोमॅक्स आणि स्पाईस यांच्या सोबत Android One ची घोषणा केली होती आणि याला भारतीय कंपन्यांनी पाठींबाही दिला होता.

स्वस्तात मस्त
ग्राहकांचा विचार करता गुगलने Android One स्मार्टफोन्सवर परवडणारी किंमत लावली आहे. तसेच या फोनमध्ये Android सॉफ्टवेअरही देण्यात आले आहे. तर, मोटोच्या यशस्वी पदार्पणानंतर 10,000 रुपयांपर्यंतचा स्मार्टफोन ग्राहकांसाठी योग्य ठरेल असे मानण्यात येत आहे.
काय असेल वैशिष्ट्य्
या नवीन स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे याचे हार्डवेअर सर्वात चांगले असेल तसेच ओएसच्या साह्याने या मोबाईलमध्ये सर्व प्रकारचे ब्लोटवेअर (bloatware) इन्स्टॉल करता येईल.
गुगल अँड्राईड, क्रोम आणि अॅपचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुंदर पिचाई यांनी सांगितले की, "यशाची अनेक शिखरे पार करणारे अँन्ड्रॉईड वन हार्डवेअर सोबत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. हा फोन बनवण्यासाठी जेवढा खर्च आला आहे, त्यास गुगल आणि ओईओम्स (OEM, original equipment manufacturer) यांच्यात विभागणी होईल." या स्मार्टफोनची किंमत 7000 ते 10,000 रुपयांदरम्यान असेल. 15 सप्टेंबरला Android One ची लॉन्चिंगसाठी पिचाई उपस्थित राहू शकतात.

पुढील स्लाईडवर पाहा, या गुगलच्या अँन्ड्रॉईड वन इव्हेंटचे फोटो...