Home | Business | Gadget | google launches new google specs

गुगलच्या चष्म्यामुळे बदलेल इंटरनेटची दुनिया

दिव्‍य मराठी | Update - Apr 06, 2012, 10:54 PM IST

या चष्म्यात गुगल लॅटिट्यूड, गुगल मॅप आणि गुगल गॉगलसारख्या सुविधा राहतील. रिपोर्टनुसार असे चष्मे या वर्षांच्या शेवटी 250 ते 600 डॉलरपर्यंत विकत मिळतील.

 • google launches new google specs

  तुमच्या पाठीमागे कोण उभा आहे किंवा येत आहे हे बघण्यासाठी आता तुम्हाला मान वळवण्याची गरज नाही. तुम्ही जेथे उभे आहात ते ठिकाण कोणते आहे, जवळपास कोणते भवन किंवा तो भाग कोणता आहे हे विचारण्याचीही आता गरज नाही. कारण गुगलचा चष्मा आता ती सगळी माहिती तुम्हाला देईल. ई-मेल, मेसेज आणि अन्य इंटरनेटसंबंधी फीचर्सची माहितीही या चष्म्यातून मिळेल.
  गुगल प्लसवर कंपनीकडून पाठवण्यात आलेल्या मेसेजनुसार चष्मा बनवणारी कंपनी टायटनने असा चष्मा बनवण्याचे कार्य सुरू केले आहे. या चष्म्याच्या मदतीने ऑनलाइन जगताला वास्तविक दुनियेत सामावून घेता येणार आहे.
  ही गोष्ट ऐकताना विज्ञान कथेतील कल्पनेच्या भरारीसारखी वाटेल, पण सर्च इंजिन कंपनी गुगल इलेक्ट्रॉनिक चष्मे विकसित करत आहे. याद्वारे कोणत्याही सूचना किंवा माहिती थेट ग्राहकांच्या नजरेपर्यंत येणार आहे.
  गुगलने या चष्म्यासंबंधीची माहिती आता उघड केली आहे. हे चष्मे स्मार्टफोनसारखे आहेत. ज्यात लेन्स कॉम्प्युटरच्या मॉनिटरची भूमिका निभावणार आहेत.
  ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या बातमीनुसार कमी रेझ्युलेशन असणा-या कॅमे-यासारखे असलेल्या गुगल चष्म्यातून आसपासचे भवन, स्थान, आसपासच्या भागात थांबलेले मित्र आदींची माहिती तत्काळ समोर उपलब्ध होईल.
  गुगलच्या एका कर्मचा-याने सांगितले की, या चष्म्यात गुगल लॅटिट्यूड, गुगल मॅप आणि गुगल गॉगलसारख्या सुविधा राहतील. रिपोर्टनुसार असे चष्मे या वर्षांच्या शेवटी 250 ते 600 डॉलरपर्यंत विकत मिळतील. या चष्म्यावर थ्रीजी-फोरजीच्या साहाय्याने माहिती उपलब्ध होईल. जीपीएस व अन्य सेन्सर्समुळे आपणास आजूबाजूची माहिती मिळवता येणार आहे.

Trending