आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधूमेहाची माहिती सांगणार गुगलची नवीन कॉन्टॅक्ट लेन्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुगल ग्लासनंतर आता गुगल एक खास कॉन्टॅक्ट लेन्स तयार करीत आहे. गुगल आता एक असे कॉन्टॅक्ट लेन्स बाजारपेठेत आणणार आहे जे मधुमेहींना फायदेशीर ठरणार आहे.

गुगल अभियंते सध्या एक असे कॉन्टॅक्ट लेन्स बनवण्यात व्यस्त आहे जे शरीरातील ग्लूकोजची पातळी मोजण्यास मदत करेल. हे लेन्स दिसायला सामान्य कॉन्टॅक्ट लेन्ससारखेच असेल. या लेन्समध्ये छोटे छोटे वायर आहेत जे डोळ्यांतील आश्रूवरून शरीरीतील ग्लूकोजचे प्रमाण मोजतील. या लेन्समध्ये एक चिपही असणार आहे. ज्याचे सेंसर लेन्सच्या लवचिक लेअरच्या मागे असतील. या लेन्सने डोळ्यांना कसलीही इजा होणार नाही.

जगातील 19 व्यक्तींमागे एकाला मधुमेह असतो. या आजाराचा सर्वच अवयवांवर प्रभाव पडतो. अनेक शास्त्रज्ञांचे मधुमेहावर संशोधन चालू आहे. रोज पायी चालणे, योग्य जेवण आणि व्यायम या उपायांनी ग्लूकोजची पातळी सामान्य ठेवता येते. काही लोक ग्लूकोज मोजण्यासाठी ग्लूकोज मॉनिटर वापरतात तर काहीजण आज ही पिन आणि ग्लूकोजचा वापर करतात. हीच समस्या सोडवण्यासाठी गुगल हे नवीन लेन्स डिझाइन करत आहे.