आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GOOGLE MAP वर एलिअन स्पेसशिप पाहिल्याचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रावर स्पेसशप पाहिल्याचा दावा करण्यात आला आहे. गुगल मुनने क्लिक केलेल्या 17 फोटोंमध्ये ही स्पेसशीप दिसत आहे. असामान्य विषयांवर संशोधन करणा-या एका व्यक्तीने गुगल मॅपवर हे फोटो शोधले आहेत. एलिअन आणि युएफओ विषयात संशोधन करणा-या वेबसाइटनुसार त्रिकोणी आकाराची दिसणारी ही वस्तू स्पेसशिपच आहे. यात लहान लहान ठिपके आहेत, जे एलिअन स्पेसशिपचे लाइट आहेत. हा व्हिडीओ युट्युबवर देखील टाकण्यात आला आहे.

गुगल मॅप फोटोमुळे वाद सुरू झाल्याची काही पहिलीच घटना नाही. या आधीही रशियामधील डेड बॉडीचा फोटो आणि Google street view वर ब्रिटनमधील एका प्रेमी युगुलाचा आक्षेपार्ह फोटो पाहायला मिळाला होता. या तंत्रज्ञामुळे कित्येक लोकांना बदनामीचा सामना करावा लागला. आता ही एलिअनची गोष्ट किती खरी आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.