आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Google देणार \'मोबाइल मेसेजिंग अॅप\'चे गिफ्ट, Watsapp ला स्पर्धक मिळणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Google लवकरच स्‍मार्टफोन्‍स यूजर्सना एक मोबाइल मेसेजिंग अॅपचे गिफ्ट देणार आहे. यामुळे अल्पावधित लोकप्रिय झालेल्या 'Watsapp'ला टक्कर देण्यासाठी Google ने कंबर कसली आहे.

एका इंग्रजी भाषिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, स्मार्टफोन यूजर्सला गुगल लॉग-इन आयडी टाकावा लागणार नाही. याशिवाय अॅपसोबत भारतीय भाषा जोडण्यात आला आहे. मात्र, Google तर्फे याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

सुरु झाली तयारी...
Google चे प्रॉडक्ट मॅनेजर निखिल सिंघल हे गेल्या महिन्यात भारतात आले होते. सिंघल यांनी देशात मेसेजिंग अॅप इको सिस्‍टमचा रिसर्च करण्यासाठी पाठवण्यात आले होते. गुगल मेसेंजरचे काम सुरु झाले असून 2015 पर्यंत ते लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निखिल सिंघल गूगल हॅंगआउट्स, फोटोज आणि गुगल प्लस कोर अँड प्लेटफॉर्मचे प्रॉडक्ट मॅनेजमेंट डायरेक्टर आहे. निखिल सिंघल सध्या इको सिस्‍टम समजून घेण्‍यासाठी आशिया पॅसेफिक देशांचा दौरा करत आहेत.

फ्री असेल मॅसेंजर...
Google तर्फे सुरु करण्‍यात येणार असलेले मॅसेंजर अॅप स्मार्टफोन यूजर्ससाठी अगदी मोफत मिळणार आहे. सध्या 'Watsapp' युजर्सकडून 53 रुपये प्रति वर्ष शुल्क आकारते. हे शुल्क Watsapp सेवा सुरु झाल्यानंतर एका वर्षानंतर आकारते. गुगल आपले मेसेंजर अॅप भारतासह अन्य देशातही लॉन्च करणार आहे.

Google 'लॉग-इन'ची गरज नसेल...
मिळालेल्या माहितीनुसार, गुगल प्रॉडक्ट्सप्रमाणे या मेसेंजर अॅपमध्ये यूजर्सला गुगल लॉग-इन आयडी टाकणे आवश्यक नसेल. गुगल यात सर्व भारतीय भाषांचा समावेश करणार आहे. विशेष म्हणजे व्हॉइस टू टेक्स्ट मेसेजिंग फीचरही जोडण्यात आले.

Watsappशी स्पर्धा..
दरम्यान, 'Watsapp' खरेदी करण्यासाठी गुगलने बोली लावली होती. परंतु 'Facebook'ने बाजी मारली. गुगलने 10 बिलियन डॉलर्सची (60000 कोटी रुपये) बोली लावली होती. मात्र, 'Facebook'ने Watsappला 19 बिलियन डॉलर्स (1.2 लाख कोटी रुपये) देऊन खरेदी केले.