आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुपच खास आहे गुगलचे हे ऑफस, इथे आहे प्रणय झोनपासून सर्वकाही...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात मोठी इंटरनेट कंपनी गुगलच्‍या नावावर एक नवा विक्रम नोंदविला जाणार आहे. कंपनी जगातील सर्वात मोठे हायटेक कार्यालय लंडनमध्‍ये तयार करत आहे. हे कार्यालय 2016 पर्यंत तयार होण्‍याची अपेक्षा आहे. या कार्यालयाच्‍या ओपनिंगला वर्षभर विलंब होऊ शकतो, असे गुगलने काही दिवसांपूर्वी म्‍हटले होते. हे कार्यालय जगातील सर्वात स्‍टाईलिश आणि सुंदर असल्‍याचा दावा कंपनी करत आहे.

जवळपास 1 लाख वर्गफुट परिसरात हे कार्यालय तयार करण्‍यात येत आहे. 'ऑलफोर्ड हाल मोनागन मॉरिस' ही लंडनची कंपनी कार्यालयाचे काम करीत आहे. कार्यालयासाठी तब्‍बल 6500 कोटी रुपये खर्च होत आहेत. जवळपास 90 टक्‍के काम पूर्ण झाले आहे.

गुगलचे हे हायटेक कार्यालय 11 मजली असून त्‍यात केवळ 4500 कर्मचारीच काम करणार आहेत. कार्यालयामध्‍ये व्‍हॉलिबॉल कोर्ट, 19 कॅफे, 19 स्‍नॅक्‍स किचन, 2 आऊटडोर स्विमिंग पूल, बिलियर्ड टेबल्‍स आणि इतर अनेक सुविधा आहेत. एवढेच नव्‍हे तर या कार्यालयात प्रणयाची इच्‍छा तृप्‍त करण्‍यासाठी तब्‍बल 5 प्रणय झोन्‍स तयार करण्‍यात आले आहेत. कर्मचारी आपसी सहमतीने प्रणय करु शकतात.

गुगलने कर्मचा-यांसाठी पुरेपुर सुविधा या कार्यालयात दिल्‍या आहेत. रेस्‍ट झोनपासून सर्व प्रकारच्‍या सुविधा येथे आहेत. निसर्गासोबत कर्मचा-यांना जोडण्‍यासाठी ठिकठिकाणी नेचर पार्कही तयार करण्‍यात आले आहेत. तसेच जिम, सायकलिंग रुम, क्‍लाईंबिंग वॉल, ऑलिम्पिक ट्रेनिंग सेटर इत्‍यादी स्‍पोर्ट्सच्‍याही सुविधा आहेत.

गुगलच्‍या या खास कार्यालयाची आतील दृष्‍ये आणि खास झलक पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...