आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून \'गुगल रीडर\' होणार बंद, वाचकांना प्रतिक्षा पर्यायाची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- इंटरनेटच्‍या विश्वातील आघाडीची कंपनी 'गुगल'ने आजपासून (1 जुलै) '‍रीडर' ही सुविधा बंद करण्‍याचा निर्णय घेतला आहे. 'गुगल रीडर' या सेवेमार्फत ताज्‍या घडामोडी, विविध लेख आणि विविध वेबसाईट्सवरील आवडत्‍या विषयांसंदर्भात लिंक्‍स मिळत होत्‍या. त्‍या आता मिळणार नाहीत. ही सेवा वापरणा-यांनी यापुर्वी पाठविण्‍यात आलेल्‍या माहितीचा बॅकअप घ्‍यावा, असा संदेश 'गुगल'ने दिला आहे.

गुगलने मार्च 2013 मध्ये ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आजपासून ही सेवा आजपासून बंद झाली आहे. गुगलने ऑक्‍टोबर 2005 पासून 'रीडर'ची सेवा सुरु केली होती. आवडीच्‍या विषयांसदर्भात लिंक्स वाचकांना थेट मिळत होत्‍या. थेट संबंधित साईटवर जाण्‍याची गरज नसल्‍यामुळे ही सेवा लवकरच लोकप्रिय झाली होती.

'रीडर'चा सर्वात मोठा फायदा म्‍हणजे, आवडत्‍या विषयाशी संबंधित लिंक्‍स सतत अपडेट होत होत्‍या. त्‍यामुळे मोठ्या प्रमाणात वेळेची बचत व्‍हायची. अशा प्रकारची सेवा देणारी गुगल ही पहिली कंपनी नव्‍हती. परंतु, गुगलची सेवा यासंदर्भात एक आदर्श ठरली होती. ही सेवा बंद केल्‍यामुळे जगभरातील वाचक निराश झाले आहेत. या सेवेला पर्याय म्‍हणून गुगल काय सुरु करणार, याकडे आता वाचकांचे लक्ष लागले आहे. अर्थात आयफोन, आयपॅडवर ही सेवा शुल्क भरल्यानंतर उपलब्ध होणार आहे.