आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकेकाळी तरुणाईला भुरळ घालणारे ORKUT होणार बंद, गुगलचा निर्णय!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुगलने त्यांची पहिली सोशल नेटवर्किंग साईट ठरलेले ऑर्कुट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दहा वर्षांपुर्वी सुरू झालेले ऑर्कुट सुरुवातीच्या काळात तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले होते. पण फेसबूकच्या आगमनामुळे त्याची लोकप्रियता कमी झाली. स्पर्धेत टिकाव धरण्यास अपयश आल्यामुळे ही सेवा बंद करण्याचा निर्णय गुगलच्या वतीने घेण्यात आला आहे.
प्रामुख्याने ब्राझील आणि भारतात प्रामुख्याने Orkut वापरले जाते. पण त्याचा जगात इतरत्र प्रसार होत नसल्याने आपल्या इतर सोशल नेटवर्किंग सेवांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी 30 सप्टेंबरपासून ते बंद करण्याची घोषणा गुगलने केली आहे.
फोटो - प्रतिकात्मक
पुढे वाचा - का घेतला निर्णय?