आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महागड्या स्मार्टफोनला गुगलचा स्वस्त पर्याय, देशी कंपन्यांसोबत आणणार 6 हजारांचा मोबाईल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात 30 हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या महागड्या स्मार्टफोनची मागणी पहिल्यांदाच घटली आहे. स्वस्तातील फोनकडे कल वाढला आहे. या पार्श्वभूमीवर गुगल देशी कंपन्यांसोबत मिळून 100 डॉलर्सपेक्षा कमी किमतीतचे स्मार्टफोन बाजारात उतरवणार आहे. या ‘अँड्रॉइड वन’ या मालिकेतील फोन स्वस्त मात्र मर्यादित फिचर्सचे असतील. गुगलचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुंदर पिचाई यांनी बुधवारी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये या फोनची रुपरेषा सादर केली. विशेष म्हणज हे फोन जगभरात सर्वप्रथम भारतातच ऑ क्टोबरपर्यंत लाँच होणार आहेत.

अँड्रॉइड वनची वैशिष्ट्ये
ऑक्टोबरपर्यंत फोनचे लाँचिंग
०5 इंचापेक्षा कमी स्क्रीन ०दोन सिम कार्ड ०एफ एम रेडिओ ०एसडी कार्ड
० नेक्सस फोन व गुगल प्ले मध्ये असलेले सॉफ्टवेअर या अँड्रॉइड वन फोनमध्येही असेल.

देशी कंपन्यांशी टायअप
मायक्रोमॅक्स, कार्बन व स्पाइस
स्वस्तातील स्मार्टफोनसाठी गुगलने मायक्रोमॅक्स, कार्बन व स्पाइससारख्या भारतीय कंपन्यांसोबत हातमिळवणी केली आहे. या कंपन्यांचे बाजारात आधीपासूनच स्वस्त स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत.

लाँचिंग जोमात : आयडीच्या संशोधनानुसार, भारतात 57 टक्के स्मार्टफोन ग्राहकांना त्यांचा मोबाइल 18 महिन्यांपर्यंत वापरावासा वाटतो. मात्र, बहुतांश ब्रँड हे अतिशय कमी कालावधीत थोड्याबहुत सुधारणा करून नवनवीन मॉडेल्स बाजारात आणत आहेत.

पुरवठ्यात घट : सीएमआर इंडिया संस्थेच्या आकडेवारीनुसार मार्च तिमाहीत महागड्या स्मार्टफोन निमार्त्यांकडून होणार्‍या पुरवठ्यात 29 टक्क्यांची घट झाली आहे. स्मार्टफोन बाजारात एकचतुर्थांश वाटा असलेल्या महागड्या स्मार्टफोनची विक्रीतही घटली.

महागड्या स्मार्टफोनच्या विक्रीचा घटता आलेख
विक्रीवर नजर ठेवणार्‍या जीएफके इंडिया संस्थेच्या आकडेवारीनुसार स्मार्टफोन बाजाराच्या वृद्धीदराने जानेवारीपासून कमी होत फेब्रुवारीत नीचांक गाठला. मोबाइल स्टोर, युनिव्हर्सेल, क्रोमा आणि प्लॅनेट एम सारख्या रिटेल स्टोरनुसार नव्या स्मार्टफोनमध्ये आधीच्या तुलनेत किरकोळ बदल करण्यात आले आहेत.