सिडनी - जगप्रसिध्द सर्च इंजिन असलेल्या गूगलने आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. गुगलने अॅमेझॉनच्याच पावलावर पाऊल टाकत ऑस्ट्रेलियाच्या ग्रामीण भागात रोबोटसारख्या ड्रोनच्या साह्याने औषधीचे सामान उतरवण्यात यश आले आहे. हा रोबोट अॅमेझॉनच्या ड्रोनपेक्षा खुप वेगळा आहे. या रोबोटने यापुर्वीच गुगलच्या ड्रायव्हरलेस कार प्रकल्पात अत्यंत चांगली कामगिरी केली आहे.
गुगलने या प्रकल्पाला 'प्रोजेक्ट विंग' असे नाव दिले आहे. या पहिल्या परिक्षणांतर्गत या ड्रोनच्या साह्याने एका शेतकर्याच्या घरात कुत्र्याच्या इलाजासाठी औषधी पाठवण्यात आली आहे. हे ड्रोन व्हर्टीकली टेक ऑफ आणि लँडिंग करत असून हे एका अंतराळयानाप्रमाणेच दिसते. हे रोबोटिक ड्रोन गुगलच्या मॅकेनिकल इंजिनिअर जोना कोहन यांनी बनवले आहे. त्यांनी एमआयटीमधून शिक्षण घेतले आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, या ड्रोनची काही छायाचित्रे
नोट - सर्व फोटो गुगल सर्चमधून घेण्यात आली आहेत...