Home | Business | Gadget | google-unveils-google-glasse

गूगल चष्मा बदलून टाकेल इंटरनेटचं जग!

भास्कर न्यूज | Update - Apr 05, 2012, 02:28 PM IST

ई-मेल, मेसेज आणि अन्य इंटरनेटबाबत सर्व माहितीही एका क्षणात हा गूगल चष्मा तुमच्यासमोर उपलब्ध करून देणार आहे.

  • google-unveils-google-glasse

    तुमच्या मागे कोण आहे, हे पाहण्यासाठी आता तुम्हाला मान फिरून पाहण्याची गरज नाही. तसेच तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात तो परिसर कुठला आहे, त्याच्या आजुबाजुला कोणकोणत्या वास्तू आहेत, हे कोणाला विचारण्याची आवश्यकता नाही. कारण याची माहिती तुम्हाला 'गूगल इलेक्ट्रॉनिक चष्मा' अगदी सहज आणि अल्पावधीत उपलब्ध होणार आहे. ई-मेल, मेसेज आणि अन्य इंटरनेटबाबत सर्व माहितीही एका क्षणात हा गूगल चष्मा तुमच्यासमोर उपलब्ध करून देणार आहे.
    टायटन कंपनी गूगल चष्मा तयार करण्याचे काम करीत आहे. या चष्म्याच्या मदतीने घर बसल्या संपूर्ण जगात फेरफटका मारणे शक्य होणार आहे. या चष्म्याच्या माध्यमातून जगाच्या पाठीवरची सगळी माहिती युझर्सच्या डोळ्यासमोर उपलब्ध होणार आहे.
    गूलल चष्मा स्मार्टफोनसारखा असणार असून त्याचे लेंस कॉम्प्युटरच्या मॉनिटरची भूमिका निभावणार आहेत. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, गूगल चष्म्यात बसविण्यात आलेले कमी रेझ्युलेशन असणारे कॅमेरे आजुबाजूचा परिसर आणि वास्तूची माहिती क्षणात युझर्सच्या डोळ्यासमोर उपलब्ध होणार आहे. या चष्म्यात 'गूगल लॅटिट्यूड, गूगल मॅप आणि गूगल गॉगल्स' सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. डिसेंबर 2012
    पर्यंत गूगल चष्मा उपलब्ध होणार असून त्याची किंमत 250-600 डॉलर इतकी असणार आहे. 3जी आणि 4जी कनेक्शनद्वारा गूगल चष्म्यावर माहिती (डाटा) उपलब्ध करून दिला जाणार आहे.Trending