आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'गुगल\'चा \'अँड्रॉईड वन\' स्मार्टफोन आज होणार लॉन्च; Flipkart वर झाला आहे लिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: फ्लिपकार्ट वेबसाइटवर स्पाइसच्या एंड्रॉइड वन स्मार्टफोन काही तासांसाठी दिसला होता.

नवी दिल्ली - तंत्रज्ञानाच्या जगातील पहिल्या क्रमांकाची कंपनी असल्येल्या गुगल आज (सोमवार) भारतात अँड्रॉईड वन हे स्मार्टफोन आज सादर करणार आहे. विशेष म्हणजे, यातील एक स्मार्टफोन लॉन्च होण्याच्या 24 तास आगोदरच रविवारी हा फोन ऑनलाईन लिक झाला होता. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर काही तासांकरीता स्पाईस अँड्रॉईड वन UNO Mi-498 उपलब्ध असल्याचे दिसले, मात्र काही वेळानंतर लगेचच हा फोन वेबसाईटवरून काढण्यात आला. साइटवर या फोनची किंमत 6999 रुपये एवढी दाखवण्यात आली होती. गुगलने जूनमध्ये अँड्रॉईड वन स्मार्टफोन लॉन्च करण्याचे जाहिर केले होते. स्पाईस कंपनीसुध्दा या स्मार्टफोन्सना बनवणारी एक कंपनी आहे. याशिवाय मायक्रोमॅक्स आणि कार्बनसुध्दा या रेंजमध्ये उतरणार आहेत. गूगल 15 सप्टेंबरला अत्यंत माफक दरांमध्ये या स्मार्टफोनची रेंज अँड्रॉईड वन लॉनच करणार होता. मायक्रोमॅक्सचा फोन अॅमेझॉन इंडिया, तर कार्बनचा फोन स्नॅपडिलवर उद्या दुपारी (सोमवार) 1 वाजता उपलब्ध होणार आहे.

स्पाइस अँड्रॉईड वन UNO Mi-498 ची वैशिष्ट्ये
या फोनमध्ये 4.5 इंचाची आयपीएस FWVGA (480x854p) डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये इसमें 1.3GHz मीडिया टेक क्वॉड कोर प्रोसेसर देण्यात आले असून 1 जीबी रॅम आहे. इंटरनल मेमरी 4 जीबी तर मेमरी कार्डच्या साह्याने या फोनची मेमरी 32 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. या फोनमध्ये 10 जीबीपर्यंत स्पाईस क्लाऊड स्टोरेजची सुविधा तर 13 जीबी गूगल ड्राइव स्पेसही मिळतो. यामध्ये अँड्रॉईड 4.4.4 किटकॅट ऑपरेटींग सिस्टीम देण्यात आली आहे. यामध्ये रेअर कॅमेरा 5 मेगापिक्सल विथ फ्लॅश आणि फ्रन्ट कॅमेरा 2 मेगापिक्सल एवढ्या क्षमतेचा देण्यात आला आहे. या फोनमध्ये एचडी वीडियो कॅप्चरिंग सुविधाही देण्यात आली आहे. या फोनची बॅटरी 1700 एमएएच एवढ्या क्षमतेची देण्यात आली आहे, तर याशिवाय ब्लूटूथ 4.0, 3G, Wi-Fi इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत.