आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Google's New Self driving Car Has No Steering Wheel Or Brake

गुगल बनवणार विनास्टिअरिंग कार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस- इंटरनेट क्षेत्रात आघाडीवर असलेल्या गुगलने आता स्टिअरिंग नसलेली कार बनविण्याची योजना आखली असून ही कार स्वयंचलित असणार आहे. गुगलचे सहसंस्थापक सर्जी ब्रीन यांनी सांगितले की, गुगलने छोट्या आकाराच्या अशा 100 कार बनविण्याची योजना आखण्यात आली आहे.

या कारला ब्रेक किंवा गॅसे पॅडेलही नसणार आहेत. एका बटणावर सुरू होणारी ही कार आपल्याला जिथे थांबायचे आहे तेथे थांबेल. या कारसाठी एक स्वतंत्र सॉफ्टवेअर बनविण्यात आले असून त्याच्या साह्यानेच ही प्रवास करू शकणार आहे. सेन्सरचा वापरही मोठय़ा प्रमाणात करण्यात येणार आहे. गुगलने ही कार विक्रीला न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही कार हजारो किलोमीटर पळविण्यात येणार आहे.