आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • GOSF Starting Day Top Gadget Deals With Discount

GOOGLE शॉपिंग फेस्टिवल: वाचा, पहिल्या दिवशी कोणत्या गॅजेट्सवर किती Discount!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
GOOGLE चे बहुप्रतिक्षित ग्रेट ऑनलाइन शॉपिंग फेस्टिवल (GOSF) बुधवारपासून सुरु झाले. या निमित्ताने जगातील अनेक ई-कॉमर्स कंपन्या आपले प्रॉडक्ट्स डिस्काउंट रेटमध्ये विक्री करत आहेत. 'Flipkart'ने काही दिवसांपूर्वी 'बिग बिलियन सेल' आयोजित केला होता. 'Flipkart' चा हा सेल फक्त एका दिवसांसाठी होते. मात्र, GOOGLE शॉपिंग फेस्टिवल बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस सुरु राहाणार आहे.

'www.gosf.in' या लिंकवर जाऊन या फेस्टिवलविषयी सविस्तर माहिती मिळेल. 'Rs. 299 Corner' नामक एक नवे सेक्शन पहिल्यांदा सुरु केले आहे. या सेक्शनमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या वस्तुंवर मोठा डिस्काउंट आणि फ्री डिलिव्हरी देण्यात येणार आहे.

Google शॉपिंग फेस्टिवलमध्ये 'नेक्सस 6' देखील लॉन्च होणार आहे. तसेच अनेक कंपन्या आपले नवे उत्पादन लॉन्च करण्‍याची शक्यता आहे. Amazon, snapdeal आणि Juboung या कंपन्याही या फेस्टिवलमध्ये सहभागी होणार आहे. मात्र, Flipkart ने सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

Google ने 2012 मध्ये पहिल्यांदा भारतात शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन केले होते. 2013 साली आयोज‍ित करण्‍यात आलेल्या शॉपिंग फेस्टिवलमध्ये जवळपास 270 पार्टनर्स सहभागी झाले होते. तसेच 20 लाख ऑनलाईन ग्राहकांनी google शॉपिंग फेस्टिवलला व्हिजिट दिली होती.

divyamarathi.com आपल्या वाचकांसाठी GOSF च्या पहिल्या दिवसाच्या 11 निवडक डील्सबाबत माहिती देत आहे. ही माहिती GOSF च्या वेबसाइटवरून घेण्यात आली आहे.

HTC Desire 820
मार्केट प्राइस- 24480 रुपये.
डील प्राइस- 21999 रुपये.
सेविंग्ज- 2481 रुपये.

फीचर्स...
>अँड्रॉइड किटकॅट 4.4.2 ऑपरेटिंग सिस्टम
>1.5 GHz चे क्वॉड-कोर प्रोसेसर
>2 GB रॅम
>16 GB इंटरनल मेमेरी
>5.5 इंचाचा डिस्प्ले
>720X1280 पिक्सलचे रेझोलेशन
>13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा
>8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
>2600 mAh बॅटरी
पुढील स्लाइड्‍वर क्लिक करून वाचा अन्य डील्सविषयी...