आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Committed To Fiscal Consolidation: Jayant Sinha

योग्य मूल्यानेच बँकांमधील भांडवली हिस्सा विक्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रीयीकृत बँकांमधील भांडवली हिश्शाची विक्री ही आमची जबाबदारी आहे. शेवटी देशवासीयांचा हिस्सा त्यात आहे. त्यामुळे योग्य मूल्यांकन झाले तरच राष्ट्रीयीकृत बँकांमधील भांडवल हिस्सावक्री करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सरकारचे स्पष्ट मत वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी व्यक्त केले.

केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच देशातल्या २७ राष्ट्रीयीकृत बँकांमधील सरकारी भांडवली हिस्सा कमी करून तो सध्याच्या ५६ टक्क्यांवरून ५२ टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला असला तरी या भांडवल हिस्सावक्रीचा नेमका कालावधी मात्र सिन्हा यांनी स्पष्ट केला नाही. बाजाराचे कामकाज कसे चालते, मूल्यांकन कसे केले जाते, याचे आम्हाला पूर्ण ज्ञान असल्याने भागभांडवल विक्रीच्या वेळी या सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल.