आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एअर एशियाला सरकारकडून हिरवा कंदिल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टाटा ग्रुपच्या भागीदारीतून भारतात प्रवासी विमान कंपनी सुरू करण्याच्या ‘एअर एशिया’ या मलेशियातील विमान कंपनीच्या प्रस्तावाला सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. जवळपास 81 कोटी रुपयांच्या या गुंतवणूक प्रस्तावाला
विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने मान्यता दिली आहे.

नवीन विमान सेवा सुरू करण्यासाठी एअर एशियाने टाटा सन्स आणि भारतीय गुंतवणूकदार अरुण भाटिया यांच्या टेलेस्ट्रा ट्रेडप्लेस यांच्याबरोबर संयुक्त भागीदारी करार केला असल्याचे अलीकडेच जाहीर केले होते. या भागीदारीत एअर एशियाचे 49 टक्के भागभांडवल असेल तर उर्वरित 30 आणि 21 टक्के भागभांडवल टाटा सन्स आणि टेलेस्ट्राचे असेल
एअर एशिया आणि टाटा या दोन्ही कंपन्यांनी अद्याप आपल्याकडे अर्ज सादर केलेला नसल्याचे नागरी हवाई वाहतूक मंत्री अजित सिंग यांनी स्पष्ट करतानाच या प्रस्तावित विमान कंपनीशी निगडित काही प्रक्रियात्मक मुद्दे चिंतेचे आहे, परंतु याबाबत आम्ही तातडीने लक्ष घालणार आहोत, परंतु सुरक्षा, विमाने, वैमानिक आदी विविध मुद्यांबाबत आम्हाला जितकी लवकर माहिती मिळेल त्यावर हे सर्व अवलंबून असेल. विमान उड्डाणाचा परवाना देण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला आवश्यक असलेली माहिती किती झटपट मिळते त्यावर मंजुरी अवलंबून असल्याचे सिंग यांनी सांगितले.