आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Producing 60 Lack Electronic Vehicles

सरकार करणार 60 लाख इलेक्ट्रॉनिक वाहनांची निर्मिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पेट्रोल भरण्यासाठी लागणार्‍या लांबच्या लांब रांगा आणि सतत वाढत्या दरावर अंकुश लावण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने पावले उचलली आहेत. यासाठी मंत्रालय 60 लाख इलेक्ट्रॉनिक वाहनांची निर्मिती करणार असून ही वाहने रस्त्याच्या कडेला, महामार्गांवर किंवा पार्किंगमध्यही चार्ज करता येतील. यासाठी ऊर्जा मंत्रालयाच्या स्मार्ट ग्रिड व्हिजन अँड रोडमॅप फॉर इंडियाअंतर्गत एक योजना तयार करण्यात आली आहे.

स्मार्ट ग्रिड रोडमॅपच्या अनुसार भारतात राष्ट्रीय मिशनअंतर्गत 2020 पर्यंत 60 लाख इलेक्ट्रॉनिक वाहने तयार करण्यात येणार आहेत. यात 40 लाख दुचाकी तर 20 लाख चारचाकी वाहने असतील. ही वाहने चार्ज करण्यासाठी पार्किंग असलेल्या इमारती, महामार्ग आणि अपार्टमेंट्स ब्लॉकमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. विजेचे अधिक उत्पादन झाले तर ती वाहनात साठवून ठेवता यावी आणि वीज कमी पडल्यास ग्रिडला मदत व्हावी यासाठी ही वाहने व्हच्र्युअल पॉवर प्लँटच्या रूपात विकसित करण्याची योजना आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या मते, 12व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान ही चार्जिंग सुविधा निवडक शहरांतच दिली जाणार आहे.