आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Government Try To Increases Banks Capital Says Union Finance Minister P Chidambaram

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँक भांडवलाचा ओघ वाढवण्यासाठी झटणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रुपयाच्या सध्या सुरू असलेल्या घसरगुंडीने सर्वांनाच चिंतेत टाकले आहे. रुपयाच्या अवमूल्यनाबरोबरच चालू खात्यातील तूट भरून काढण्यासाठी विदेशी भांडवलाचा ओघ कसा वाढवता येऊ शकेल, याबाबत वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी मुंबईत येऊन सर्व बँकांच्या अधिका-यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली.


चालू खात्यातील तूट भरून काढण्यासाठी विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून येणा-या निधीचा ओघ महत्त्वाचा असल्याने दुपारी वित्तमंत्र्यांनी त्यांचीही भेट घेतली. परंतु या बैठका बंद दरवाजाआड झाल्यामुळे त्याबाबत अधिक तपशील मिळू शकला नाही.

आर्थिक व्यवहार सचिव अरविंद मायाराम, वित्त सेवा सचिव राजीव टकरू यांच्यासह स्टेट बँकेचे अध्यक्ष प्रतीप चौधरी, आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर, एचडीएफसी बँकेचे आदित्य पुरी, सिटीग्रुप इंडियाचे प्रमीत जव्हेरी, बँक ऑफ इंडियाच्या विजयालक्ष्मी अय्यर, कॅनरा बँकेचे प्रमुख आर.के. दुबे यांच्यासह अन्य बँकांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

रुपयाच्या सतत सुरू असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण होती. विशेषकरून गेल्याच आठवड्यात कंपन्या आणि व्यक्तींना विदेशात भांडवल नेण्यासाठी रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधांमुळे विदेशी गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सरकारच्या भांडवल नियंत्रण उपाययोजनांमुळे देश पुन्हा एकदा 1991 सारख्या आर्थिक पेचप्रसंगात तर सापडणार नाही ना, असेही भीतीचे वातावरण गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत ही बैठक महत्त्वपूर्ण होती.