आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीपीपी प्रकल्पांवर करडी नजर; मंत्रालय पातळीवर आढावा घेणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अलीकडच्या काळात सार्वजनिक- खासगी भागीदारी तत्वावर प्रकल्प बांधण्याचे पेव फुटले आहे. परंतु बर्‍याचदा हे प्रकल्प वेळेवर पूर्ण होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकल्पांची वेळेवर उभारणी व्हावी या उद्देशाने कंत्राटी कामगिरीवर परिणामकारक देखरेख ठेवण्यासाठी एक संस्थात्मक उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने खासगी - सार्वजनिक धर्तीवर बांधण्यात येणार्‍या प्रकल्पांवर देखरेख करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारण्यास गुरुवारी मान्यता दिली. या संस्थात्मक यंत्रणेमध्ये प्रकल्प देखरेख विभाग आणि कामगिरी आढावा विभाग असे दोन विभाग असतील. सरकारच्या अनेक खात्यांमधून खासगी-सार्वजनिक भागीदारीतून (पीपीपी) प्रकल्प उभारण्याचा कल वाढलेला असतानाच नियोजन आयोगाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.प्रकल्प देखभाल विभागाकडून प्रकल्प प्राधिकरण पातळीवर खासगी- सार्वजनिक प्रकल्पांच्या कामगिरीच्या देखरेखीची नोंद घेण्यात येईल तर कामगिरी आढावा विभागाकडून राज्य सरकार किंवा मंत्रालय पातळीवर घेण्यात येणार आहे.