आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांद्याचे किमान निर्यात मुल्य (MEP) 300 डॉलरवरून 500 डॉलर प्रति टन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीः कांद्याच्या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने कांद्याचे किमान निर्यात मुल्य 300 डॉलरवरून (MEP) वाढवून 500 डॉलर प्रति‍ टन करण्याचा निर्णय घेतला आहे.
17 जूनला कांद्याचे किमान निर्यात मुल्य 300 डॉलर प्रति‍ टन एवढे ठरवण्यात आले होते. मात्र वाढती महागाई लक्षात घेता सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या नव्या दरांनुसार रिटेल बाजारामध्ये कांद्याची किंमत जवळपास 25 रुपये प्रतिकिलो एवढी असेल. तसेच सरकार बटाट्यांचेही निर्यातमुल्य वाढवून 450 डॉलर प्रति‍ टन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर दुधाच्या किंमतीवरही चर्चा करण्यात आली. दुधाच्या किंमतीत होत असलेल्या दरवाढीला थांबवण्यासाठी निर्यातीत देण्यात येणारी सुट बंद करण्याच्या निर्णयावरही सरकार विचार करत आहे.