आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने एका दिवसात 600 रुपयांनी महागले; सरकार म्हणते गरजेपुरतेच खरेदी करा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- भारतात आज सोने एकदम सहाशे रुपये वाढले. केंद्रीय अर्थमंत्रालयाने सोने आणि प्लॅटिनमवर इम्पोर्ट ड्यूटी ४ टक्क्यांवरुन ६ टक्के केल्याने सोने खरेदी करणे अचानक महाग झाले आहे. आज अर्थमंत्रालयाने निर्णय जाहीर होताच सोने 325 रुपयांनी महाग झाले. इम्पोर्ट ड्यूटी जाहीर करताच लागू झाली असून, लोकांनी गरजेपुरतेच सोने खरेदी करावे, असे सरकारने म्हटले आहे.
सध्या सोन्याचा भाव 30,609 रुपये प्रतितोळा असा आहे. इम्‍पोर्ट ड्यूटी 2 टक्क्यांनी वाढवल्याने यात किमान 610 रुपयांपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे मंगळवारी सोने 31 हजाराच्या घरात जावू शकते.