आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात ‘एफडीआय’ची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मल्टिब्रँड रिटेलमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीचा प्रस्ताव फेटाळणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला (एफडीआय) मान्यता देण्याच्या तयारीत आहे. या संदर्भातील घोषणा जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे. सरकारच्या या पावलामुळे अमेझॉन आणि ई-बेसारख्या जागतिक पातळीवरील ऑनलाइन रिटेलर्सना भारतात विस्ताराची चांगली संधी मिळणार आहे.

वित्त मंत्रालयाशी संबंधित अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन क्षेत्राच्या विकासामुळे मॅन्युफॅक्चरिंगला चालना मिळेल, त्यातून आर्थिक व्यवस्था गतीने रुळावर येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भातील घोषणा जुलैमध्ये सादर होणार्‍या अर्थसंकल्पात होईल.

रिलायन्स लवकरच ई-कॉमर्स बाजारात
देशात गतीने विस्तारणार्‍या ई-कॉमर्स बाजाराने अब्जोपती उद्योजक मुकेश अंबानी यांनाही आकर्षित केले आहे. मुकेश अंबानी सर्वेसर्वा असणारी रिलायन्स इंडस्ट्रीजची सहयोगी रिलायन्स रिटेल चालू आर्थिक वर्षात ई-कॉमर्स क्षेत्रात येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक अहवालातही रिटेल बिझनेसचा सातत्याने विस्तार करण्याचे नमूद केले आहे. आगामी काळात मल्टी चॅनल शॉपिंग सादर करण्याचा रिलायन्सचा विचार आहे.