आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Govt Mulls One time Diesel Price Hike Of Rs 2 3 Per Litre

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिझेल 2 ते 3 रुपयांनी महागणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रुपयाच्या अवमूल्यनामुळे इंधन आयात खर्चात झालेली वाढ भरून काढण्यासाठी केंद्र सरकार डिझेलच्या किमतीत लिटरमागे 2 ते 3 रुपयांनी वाढ करण्याचा विचार करत आहे, परंतु स्वयंपाकाचा गॅस आणि रॉकेलच्या किमतीत मात्र वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.

उत्पादन खर्च आणि किरकोळ विक्री किंमत यातील दरी भरून काढण्यासाठी दर महिन्याला साधारणपणे लिटरमागे 50 पैशांनी वाढ केली जाते, परंतु मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यास आता 50 पैशांपेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने तेल विपणन कंपन्यांना डिझेलच्या किमतीत दरमहा 50 पैशांनी वाढ करण्याची परवानगी जानेवारी महिन्यात दिली होती, डिझेलच्या किमतीत वाढ करण्याची गरज आहे, परंतु त्याबाबत राजकीय पातळीवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे तेल मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.

दरमहा 50 पैसे वाढ अपुरी : तेल कंपन्या
इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी दरमहा 50 पैसे वाढ फारच अपुरी असून या मर्यादेत आणखी वाढ करावी, अशी मागणी केली होती. तेल कंपन्यांनी केलेल्या या सूचनेवर विचार करण्यात येत असला तरी त्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, असे तेल मंत्री वीरप्पा मोइली यांनी सांगितले.