आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govt Reduces Import Tariff Value Of Gold, Silver

सोने झाले स्वस्त, चांदीही घसरली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक संकेत आणि घटलेली मागणी यामुळे शनिवारी मौल्यवान धातूंची चमक फिकी झाली. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे ३५ रुपयांनी घसरून २८,२६५ झाले. औद्योगिक क्षेत्राकडून मागणी कमी झाल्याने चांदी किलोमागे २२५ रुपयांनी घटून ४२,७७५ झाली.

सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले, जगातील प्रमुख सराफा बाजारांतील नकारात्मक संकेत आणि देशातील सराफ्यांत घटलेली मागणी याचा दबाव मौल्यवान धातूंवर दिसून आला. न्यूयॉर्क सराफा बाजारात सोने ०.३ टक्क्यांनी घटून १२८६.६० डॉलर झाले. चांदी ०.३ टक्क्यांनी घसरून १९.५५ डॉलर झाली. देशातील सणांचा हंगाम सुरू असून त्यामुळे सोने चांदीची मागणी वाढली असून दिल्लीच्या सराफा बाजारात मागील दोन सत्रांत सोने तोळ्यामागे १२५ रुपयांनी वाढले होते. मात्र शनिवारी मागणी घटल्याचा फटका सोन्याला बसला. त्याचप्रमाणे चांदी मागील दोन सत्रांत किलोमागे ३०० रुपयांनी महागली होती. शनिवारी मात्र मागणी अभावी चांदी काळवंडली.