आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटी रिटर्न नवा फॉर्म लवकरच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - येत्या आर्थिक वर्षासाठी 2013-14 साठी नव्या स्वरूपातील प्राप्तिकर भरणा (इन्कम टॅक्स रिटर्न) फॉर्म येत्या महिनाअखेर अधिसूचित करण्यात येणार आहे. अर्थ राज्यमंत्री एस.एस. पलानिमणिक्कम यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरावेळी पलानिमणिक्कम यांनी सांगितले, येत्या आर्थिक वर्षासाठी (2013-14) प्राप्तिकर रिटर्न भरण्यासाठीचा नव्या स्वरूपातील अर्ज मार्चअखेर अधिसूचित करण्याचा प्रस्ताव आहे. मागील वर्षातील आर्थिक नियमानुसार सध्याचे शुल्क समाविष्ट करण्यासाठी सरकार दरवर्षी प्राप्तिकर रिटर्न भरण्यासाठी समभागधारकांकडून सूचना मागवते. आणखी एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, न्यायालयीन प्रकरणामुळे प्रत्यक्ष कराचे 97,611 कोटी रुपये, तर अप्रत्यक्ष कराचे 1,08,081.08 कोटी रुपये अडकले आहेत. ही रक्कम मोकळी करण्याच्या सूचना प्रत्यक्ष कर मंडळाला देण्यात आल्या आहेत.