आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉसमॉस बँकेच्या अध्यक्षपदी गोयल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सहकार क्षेत्रातील सर्वात जुनी बँक अशी ओळख असलेल्या कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल यांची, तर उपाध्यक्षपदी मधुकर अत्रे यांची एकमताने निवड करण्यात आली.

बँकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व १३ उमेदवार निवडून आले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश कोतमिरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत ही निवड करण्यात आली. या वेळी २०१५ ते २०२० या कालावधीसाठी नवीन कार्यकारी संचालक मंडळ निवडण्यात आले.