आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ग्रँड आय 10’ देणार स्विफ्टला टक्कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एकीकडे बीएमडब्ल्यूच्या आलिशान ‘डायनॅमिक वन’ मोटारीचे अनावरण मुंबईत होतानाच दुसर्‍या बाजूला दिल्लीत ह्युंदाई मोटार इंडियाने मारुती स्विफ्ट , फोर्ड फिगो या मोटारींना टक्कर देण्यासाठी ‘ग्रॅँड आय 10’ ही छोटेखानी आकर्षक मोटार वाहन बाजारात सादर केली आहे. वाहन बाजारातील विद्यमान ‘आय 10’ आणि आय 20’ च्या धर्तीवरच आलेल्या या नव्या ‘ग्रॅँड आय 10’ मोटारीमध्ये मात्र बरेच बदल केले आहेत. रिअर एसी व्हेंट आणि आकर्षक रिअर विंडो ही दोन नवीन खास वैशिष्ट्ये या मोटारीत बघायला मिळतील.


अर्थात या नव्या मोटारीच्या आगमनानंतर कंपनीने 1.2 लिटर इंधन क्षमतेचे इंजिन असलेली ‘आय 10’ मोटार बाजारातून काढून घेण्याचा निर्णंय घेतला आहे.


दर वर्षी एक ते दोन नवीन मोटारी :
देशातील सर्वात मोठी निर्यातदार असलेल्या ह्युंदाईने सध्याच्या रुपयाच्या अवमूल्यनाचा फायदा घेताना यंदाच्या वर्षात निर्यातीमध्ये आठ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ साध्य करतानाच स्थानिक बाजारपेठेत पुढील तीन ते चार वर्षांमध्ये प्रत्येक वर्षाला एक ते दोन नवीन मोटारी आणण्याचा निर्धार केला आहे. छोटेखानी सेडान, एसयूव्ही आणि बहुउद्देशीय वाहनांमध्ये कंपनीला जास्त स्वारस्य आहे.

कंपनीचे एमडी आणि सीईओ बी.एस.राव म्हणाले की, वाहन बाजारातील सध्याची मरगळ ही तात्पुरती असून दीर्घकाळात या बाजारपेठेसाठी चांगल्या संधी आहेत. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत नवीन मोटारी बाजारात आणण्याचा कल कायम ठेवणार आहे. ग्रॅँड आय 10 हे मोटारप्रेमींसाठी नवीन आकर्षण ठरावे.


किंमत
0 ग्रॅँड आय 10 (पेट्रोल) 4.29 लाख ते 5.47 लाख रु.
0 ग्रॅँड आय 10 (डिझेल) - 5.23 लाख रुपये ते 6.41 लाख रुपये.